राजगुरूनगर – राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व राजगुरूनगरचे सुपुत्र निलेश विश्वनाथ सांगडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठामार्फत पी. एच डी पदवी प्रदान करण्यात आली.
निलेश सांगडे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातून बी.एस्सी (अॅग्री) पदवीचे घेतले. सन २०१० मध्ये एमपीएससी परीक्षेत ते राज्यात प्रथम आले होते. त्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागात पोलीस अधीक्षक पदी निवड झाली. नोकरी करत इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठ, नवी दिल्ली येथून एम.बी.ए व पी.जी.डी.बी.एम पूर्ण केले. सन २०१६ मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे पी.एच.डी साठी पूर्वपरिक्षेत पात्र झाले. “नांदेड जिल्हयातील मध्यम-लघु उदयोगामधील मालकांचे तसेच कामगारांचे ताणतणाव व त्यामुळे होणारे परिणाम” यावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी प्रदान केली. सांगाडे यांना डॉ. प्रणती टिळक, डॉ. वैद्ययांनी मार्गदर्शन केले.
राजगुरूनगर येथील निलेश सांगडे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. निलेश सांगडे यांचे वडील विश्वनाथ सांगडे हे शिक्षण विभागातील निवृत्त शिक्षण उपसंचालक म्हणून सेवानिवृत्त झाले असून आई चारूशिका सांगडे यांनी तत्कालीन राजगुरुनगर ग्रामपंचायतीमध्ये पहिल्या सरपंच म्हणून उत्कृष्ट काम केले.