Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election 2024| रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपचे नारायण राणे यांना येथून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. अखेर रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
लोकसभा उमेदवारांची 13 वी यादी गुरुवारी भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. यात नारायण राणे यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत त्यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासोबत होणार आहे.
Maharashtra: BJP announces Union Minister Narayan Rane as its candidate from Ratnagiri Sindhudurg Lok Sabha seat.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/coL2BbGCOo
— ANI (@ANI) April 18, 2024
शिंदे गटाचे किरण सावंत येथून लढण्यास इच्छुक होते
दरम्यान, या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे किरण सावंत हे इच्छुक होते. मात्र शेवटी भाजपचे नारायण राणे हे उमेदवार असणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाला या जागेवरून देखील माघार घ्यावी लागली आहे. नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांचा अर्ज भरताना आम्ही त्यांच्यासोबत राहू, आमच्यात कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले. Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election 2024|
विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याच्याआधीच नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरु केला होता. नारायण राणे मोदी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ मागच्याच महिन्यात संपला. त्यानंतर त्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्यात आले आहे.
विनायक राऊतांचा दोनदा विजय
दरम्यान, शिवसेना-भाजप युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. तिथं विनायक राऊत हे दोन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे शिंदे गटानं या मतदारसंघावर दावा केला होता. तर, भाजपनंही या मतदारसंघावर दावा ठोकला होता. त्यामुळे या जागेवरून पेच निर्माण झाला होता. Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election 2024|
हेही वाचा: