पंजाबमध्ये वाजली शाळेची घंटा, तब्बल दीड वर्षानंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाट

नवी दिल्ली – देशातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे गेल्या वर्षी 23 मार्च रोजी लॉकडाऊन लागू केला होता. देशातील सर्वच भागातील शाळा तेव्हापासून बंद होत्या. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी करोनावर प्रभावी ठरेल अशा लस बाजारात आल्या आहेत आणि आता लसीकरणाची मोहीमही सुरू झाली आहे.

यातच कित्येक महिन्यांपासून बॅड असलेल्या पंजाब मधील शाळा सुरु झाल्या आहे. पंजाब सरकारने  शनिवारी २ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने करोना निर्बंध शिथिल केले होते. त्यानुसार आता या राज्यातील शाळा सुरु झाला आहे.

दरम्यान काही राज्यातील शाळांमध्ये  विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त संख्या होती तर काही ठिकाणी ही संख्या कमी दिसून आली आहे. राज्यातील सरकारने शाळा सुरु केली असून   करोनाबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केले जाणार आहे. शाळांची वेळ ही सकाळी ८ ते दुपारी २ अशी असणार आहे.  सोमवारी पंजाब  राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.