वायनाड (केरळ) – संपुर्ण देशावर एकच नेता राज्य करेल अशी संकल्पना भाजपने राबवली आहे, पण ही संकल्पना देशातील जनतेचा अपमान आहे असा आरेाप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. भारत हा फुलांच्या गुलदस्त्यासारखा आहे यातील प्रत्येकाचा आदर केला पाहिजे कारण त्यातूनच पुष्पगुच्छाच्या सौंदर्याला चालना मिळते असे त्यांनी म्हटले आहे. (The rule of only one person over the entire country is an insult to the people – Rahul Gandhi)
त्यांना एकाधिकारशाही हवी आहे आणि आम्हाला सामुदायिक जबाबदारीचे राज्य हवे आहे, ही विचारधारा हा काँग्रेस आणि भाजपमधील मुख्य फरक आहे. काँग्रेसला देशातील लोकांचे ऐकायचे आहे आणि लोकांची श्रद्धा, भाषा, धर्म, संस्कृती याचा आदर ठेवायचा आहे. पण, भाजपला असले काहीही न करता त्यांना वरून लोकांवर काहीतरी लादायचे आहे, असा आरोप त्यांनी केला.
आरएसएसच्या विचारसरणीतून आम्हाला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळालेले नाही. भारतावर येथील सर्व लोकांचे राज्य असावे अशी आमची इच्छा आहे असे ते म्हणाले.