पुणे : पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा इयत्ता बारावीचा निकाल 93.61 टक्के इतका लागला आहे. पुणे जिल्ह्याचा निकाल 92.70 टक्के, नगर जिल्ह्याचा निकाल 94.41 टक्के आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल 94.83 टक्के लागला आहे. विभागात सोलापूर जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल लागला आहे.
पुणे विभागात बारावी परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 44 308 होती. त्यापैकी 2 लाख 42 जार 496 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 2 लाख 27 हजार 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्याची टक्केवारी 93.61 आहे. पुनर्परीक्षार्थ्यांचा एकूण 47.91 टक्के आहे, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष वंदना वाहूळ आणि सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी 1 लाख 25 हजार 959 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1 लाख 16 हजार 768 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 91.65, तर मुलींचे प्रमाण 93.90 इतके आहे. नगर जिल्ह्यातून 63 हजार 4 विद्यार्थी परीक्षा दिली. त्यापैकी 59 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 96.73, तर मुलांचे प्रमाण 92.72 आहे. सोलापूर जिल्ह्यातून 53 हजार 533 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 50 हजार 768 विद्यार्थी उत्तीर्ण ठरले. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 96.57, तर मुलांचे 92.38 इतके आहे.
तालुकानिहाय निकाल :
आंबेगाव : 95.76, बारामती : 91.11,भोर : 96.55, दौंड : 97.22, हवेली : 93.61, इंदापूर : 96.17, जुन्नर : 92.30, खेड : 91.13, मावळ : 90.56, मुळशी : 94.39,. पुणे शहर -पश्चिम : 89.57, पुरंदर : 92.33, शिरूर : 94.73, वेल्हा : 96.73, पुणे शहर : पूर्व : 92.73, पीसीएमसी : 94.64.