पिंपरी (प्रतिनिधी) – पतीचा खून करून गळफास घेतल्याचा बनाव रचला. याप्रकरणी पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) मध्यरात्री ताथवडे येथे घडली.
अनिल उत्तमराव राठोड (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिल याच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल यांचे भाऊ रविकुमार उत्तमराव राठोड (वय 32, रा. परभणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 7) फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचा भाऊ मयत अनिल राठोड आपल्या पत्नीसोबत ताथवडे येथील लोंढे वस्तीत एका खोलीत भाड्याने राहत होते. घरगुती भांडणातून सोमवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास उषा हिने अनिल यांच्या डोक्यात अज्ञात वस्तू मारून खून केला. खून केल्यानंतर उषा हिने अनिल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला.
पिंपरी-चिंचवड क्राईम : शहरात एकाच दिवशी चोरीच्या 18 गुन्ह्यांची नोंद
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. याचा प्रत्यय मंगळवारी (दि. 7) पुन्हा एकदा आला. मंगळवारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीच्या तब्बल 18 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये 11 लाख 57 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
चिखली, देहूरोड, हिंजवडी, चाकण पोलीस परिसरात घरफोडीचे चार गुन्हे दाखल आहेत. चिखली येथील घटनेत वडाचा मळा येथील दोन दुकानातून 21 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरून नेली. देहूरोड येथील घटनेत देहूगावातील बोत्रे कॉम्प्लेक्स मधील कपड्यांच्या तीन दुकानातून 29 हजार 950 रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. हिंजवडी येथील घटनेत एका घरातून सात लाख पाच हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे.
चाकण येथील घटनेत 74 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. मोरेवस्ती चिखली येथून एक मोबाइल फोन आणि लॅपटॉप चोरट्याने उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरून नेला. निगडी, चिंचवड,
पिंपरी-चिंचवड क्राईम : दोन तरुणांकडून तीन कोयते जप्त
पिंपरी (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून तीन कोयते जप्त केले. याप्रकरणी हिंजवडी आणि पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून एकाला अटक करण्यात आली.
हिंजवडी येथील कस्तुरी चौकात अक्षय उर्फ विकास अनिल वेताळ (वय 25, रा. वाकड) याला मंगळवारी (दि. 7) रात्री सव्वाएकच्या सुमारास. हिंजवडी पोलिसांनी कोयत्यासह ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलीस कर्मचारी कैलास पर्वतराव केंगले यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
शस्त्र विरोधी पथकाने रमाबाईनगर, लिंकरोड, पिंपरी येथे मंगळवारी (दि. 8) दुपारी सव्वाएकच्या सुमारास कारवाई केली. यात दोन कोयते जप्त केले. सागर सोमनाथ अंगरख (वय 20, रा. रमाबाईनगर, लिंकरोड, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
खेड शिवापूर (वार्ताहर) –पुणे – सातारा महामार्गावर पायी चालत जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीचा वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. मयताची ओळख पटली नसून याबाबत कोणास काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन राजगड पोलिसांनी केले आहे.
मंगळवारी (दि. 7) खेड शिवापूर (ता. हवेली) गावच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. अनोळखी व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 45 आहे. अंगामध्ये शेवाळी कलरचा हाफ टी-शर्ट, काळी पॅन्ट, कमरेला काळ्या कलरचा दोरा, गळ्यात लाल कलरचा गोफ, अंगाने मध्यम, असे व्यक्तीचे वर्णन आहे.