शिरूर (प्रतिनिधी) – येथील बाबुराव नगर जवळील श्री गणेशा हॉस्पिटल येथील डॉक्टर सह १४ कर्मचाऱ्यांची कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले. त्यात कारेगाव येथील वृद्ध महिलेच्या घरातील 14 नातेवाईक यांचा कोरोनाव्हायरस अहवाल निगेटिव्ह आल्याने यामुळे शिरूरकर यांना दोन्ही बाजूने मोठा दिलासा मिळाला आहे.
श्री गणेशा हॉस्पिटल येथील संपूर्ण स्टाफ आनंदित झाला आहे. आणखी चार जणांचे कोरोना तपासणीसाठी नमुने उशिरा गेल्याने त्याचा अहवाल येणे बाकी आहे. परंतु या अहवालामुळे शिरुर शहराला दिलासा मिळाला आहे. उत्तर शिरूर येथील सामाजिक कार्यात अग्रगण्य असणारे हे गणेशा हॉस्पिटल या आजच्या अहवालामुळे सुरक्षित झाले असल्याचे बोलले जात आहे.
कारेगाव येथील 80 वर्ष वृद्धा पॉझिटिव्ह निघाल्या होत्या. त्यांच्या हिस्टरी मध्ये त्यांनी शिरूर शहराजवळ बाबुराव नगर येथील श्री गणेशा हॉस्पिटल येथे 9 मे एक दिवस उपचार घेतलेले होते. त्यानंतर 10 मे रोजी या 80 वर्षीय वृद्ध महिलेस अहमदनगर येथील हॉस्पिटल व तेथून पुणे येथील खासगी हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले होते. तेथे या महिलेचा कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यात दिनांक 10 मे रोजी वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती.
बाबुराव नगर येथील हॉस्पिटलमध्ये झालेले उपचार व शिरूर जवळ कारेगाव येथील ही महिला असल्याने या गावातील नागरिकांचा व हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचा शिरूरमध्ये सारखा वावर असल्याने शिरूर शहरात खळबळ उडाली होती, तर प्रशासन सतर्क झाले होते. परंतु येथील 14 जणांची आजची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली त्यामुळे शिरूरकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.