#कोरोना- पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; पहा आजची आकडेवारी

पुणे- पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज (18मे) दिवसभरात 102 कोरोना पाॅसिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे तर 49 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

148 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 50 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.  त्यात डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-3229 आणि ससून 369 रुग्णांवर उपचार सुरु आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1599 वर पोचली आहे. तर 199 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात 1419 जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. आजपर्यंतच एकूण  1800 डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत असून कंटेन्मेंट झोनच्या बाहेर राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

सध्याचा रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता शहरामध्ये मे अखेर अथवा जूनमध्ये रुग्णांमध्ये मोठी वाढ होण्याचा धोका आहे. त्या दृष्टीने बालेवाडी येथे तब्बल 10 हजार खाटांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये काही बंधने शिथिल केली असली, तरी त्याचा गैरवापर करून गर्दी न करता सुरक्षित वावर राहील, याची प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. अन्यथा, निर्बंध कडक करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.