मुंबई – संजय लीला भंसाली दिग्दर्शित “गंगुबाई काठीयावाडी’ हा चित्रपट नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने तिकीट बारीवर दमदार यश मिळाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री ‘आलिया भट्ट’ हिने या चित्रपटात गंगुबाई काठियावाडी यांची मुख्य भूमिका साकारली असून, सोशल मीडियावर तिच्या कामाचे विशेष कौतुक होत आहे. उत्तम अभिनय करत गंगूबाईचं संघर्ष आलियाने जगासमोर आणला आहे.
‘गंगा जीवनदास काठियावड’ नावाची एक मुलगी… रमणीक नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते… बॉलिवूडमध्ये अभिनेत्री होण्याचं स्वप्न उराशी घेवून रमणीकसोबत मुंबईत येते… तो दिवस आणि ती गंगाची गंगू होते…. त्यानंतर गंगूची ‘गंगूबाई…’ असा संपूर्ण जीवन प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, खऱ्या आयुष्यात गंगूबाई कशा दिसत होत्या हे तुम्हाला माहीत आहे का? नुकतंच गंगूबाई यांच्या तरुणाईचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गंगुबाई या दिसायला खूप सुंदर आणि देखण्या होत्या. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला असल्याचे पाहायला मिळत आहे.