गॅस सिलिंडरला आग लागल्याने एकाच कुटुंबातील सहा जण होरपळ्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील उदयपूर येथे घडली आहे. घरात जेवण बनवत असताना हा अपघात झाला. जखमींना वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रविवारी रात्री उदयपूर गावातील रहिवासी शेरसिंह यांच्या घरात जेवण बनवले जात होते. त्यांची पत्नी इंद्रावती स्वयंपाक करत असताना मुले शेजारी बसली होती. यादरम्यान गॅस सिलिंडरला आग लागली. शेरसिंह यांचा दोन वर्षांचा मुलगा सुधांशू, सहा वर्षांचा दीपक आणि इंद्रावती यांच्यासह सत्यशरण, विमलेश रा. राजलपूर कुरवली मैनपुरी हे आगीत होरपळले आहेत. या मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.