मुंबई – “भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी गरोदर माता सरकारने दिलेल्या गोळ्या घेत नाहीत, असा गंभीर आरोप केला. यावरून आता वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी या आरोपावरून चित्रा वाघ यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
विरोधकांच्या टीकेवर आता चित्रा वाघ यांनी प्रतिउत्तर दिल आहे. माध्यमांशी बोलतांना चित्रा वाघ म्हणाल्या,’ नांदेडला असतांना मी हॉस्पीटल मध्ये ज्यांची बाळं कमी वजनाची जन्माला आलीयेत त्या मातांशी संवाद साधला त्यावेळी मी जे त्या मातांशी बोलले त्याचा काही हितचिंतकांनी विपर्यास करण्यास सुरूवात केलीय. माझं जे वक्तव्य आहे ते इतकं स्पष्ट आहे, जर आई कुपोषित असेल तर ती सुदृढ बाळाला कशी काय जन्म देऊ शकते ? जर आईनं गरोदरपणात आवश्यक कॅल्शियम, विटॅमिन- आयनच्या गोळ्या नीट खाल्ल्या नाही तर त्याचा परिणाम तिच्या पोटातल्या बाळावर होतोच. अशा प्रकारे विपर्यास करणा-या विरोधकांची मनस्थिती समजू शकते. तुम्ही पण डॅाक्टरला दाखवून घ्या एकदा. आणि गोळ्या घ्यायला उशीर करू नका. कारण तुमचा आजार गंभीर आहे. असं म्हणत चित्रा वाघ यांनी प्रतिउत्तर दिल आहे.