पत्रकार परिषद म्हणजे… ‘मौन की बात’ – राज ठाकरे 

राज यांची मोदी- शहा वर पुन्हा एकदा टीका
नवी दिल्ली – ५ वर्षात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली.  राजधानी दिल्लीत भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदी-शहा वर निशाणा साधला आहे.


“पंतप्रधानांची पत्रकार परिषद… ‘मौन की बात” ! असं म्हणत राज ठाकरेंनी सोशल मोडियावर ट्विट केलं आहे. असे, करत मोदींच्या शांत बसण्यावर राज यांनी निशाणा साधला आहे. भाजपच्या मुख्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली होती. उद्या (१९ मे) लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्यातील मतदान पडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.