विरवडे गोळीबाराच्या गुन्ह्यातील हल्लेखोरांना अटक

कराड – पूर्ववैमनस्यातून विरवडे, ता. कराड येथील श्रीकांत मदने यांच्यावर गोळीबार करुन तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील चार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. विजय उर्फ पैलवान चंद्रकांत भोसले (वय 20), ललित उर्फ देवा तानाजी गायकवाड (वय 19), संजय उर्फ बापू जालिंदर भोसले (वय 19) आणि अभिजीत उर्फ किशा जगन्नाथ लोखंडे (वय 18, रा. वाघेरी, ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी, श्रीकांत मदने हे गुरुवार, दि. 28 मार्च रोजी ओगलेवाडीहून विरवडेकडे जात असताना रात्री सव्वा नऊच्या सुमारास चार अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार करुन कोयत्याने हल्ला करुन ठार मारण्याचा प्रयन केला होता. मात्र, श्रीकांत मदने हे हल्ल्यातून बचावले. या गुन्ह्याचा छडा लावून संशयितांना अटक करण्याची सूचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला केल्या होत्या. गोपनीय माहितीवरुन पोलीस निरीक्षक विजय कुंभार, उपनिरीक्षक सागर गवसणे यांच्या पथकाने शिरवडे येथे सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले तसेच या गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.