लोणी धामणी -लोणीवरून (ता. आंबेगाव) खेड व शिरूरला जाणारा कमी अंतराचा मार्ग म्हणजे लोणी मार्गे जाणारा शेकोजीबाबा घाट रस्ता. या रस्त्यावर वाहनांची कायम वर्दळ असते. या रस्त्यावर गेल्या दोन दिवस पडणाऱ्या पावसाने घाटात दरड कोसळली आहे.
त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला असल्याची माहिती हभप तानाजीमहाराज तांबे यांनी दिली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे त्वरीत लक्ष देऊन रस्त्यावर पडलेले दगड काढावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक अवसरी गट प्रमुख मयूर सरडे यांनी केली आहे.