Tiger Shroff and Disha Patani| अभिनेता टायगर श्रॉफ सध्या त्याच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार देखील मुख्यभूमिकेत झळकणार आहे. सध्या हे दोघे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहेत. मात्र प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असणार टायगर त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आला आहे. टायगर आणि दिशा पटानीच्या अनेकदा चर्चा रंगलेल्या दिसतात. नुकतेच एका कार्यक्रमात टायगरने केलेली वक्तव्यानंतर त्याने एक्स गर्लफ्रेंड दिशा पटानीशी पॅचअप केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत टायगरने दिशाच्या नावाचा उल्लेख केला आहे. मुलाखतीत टायगर ‘तू सिंगल आहेस का? तुझं आयुष्य कोणत्या दिशेला जात आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर टायगर म्हणाला, ‘माझ्या आयुष्यात फक्त एकच दिशा आहे, ते माझं काम.’
यावेळी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या ट्रेलर लॉंचमध्ये अक्षय कुमार याला विचारलं की, ‘टायगरला काय सल्ला देऊ इच्छितो?’ यावर खिलाडी कुमार म्हणाला, ‘मी टायगर याला फक्त एवढंच सांगेल की एकाच दिशेवर लक्ष केंद्रीत कर’, असा सल्ला दिला. त्यावर सर्व जण हसतात.
एकेकाळी टायगर आणि दिशा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. या दोघांनी ‘बेफिकरा’, ‘बाघी-2’ सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यानंतर दोघांनी वेगळेहोण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा:
साताऱ्यातून शशिकांत शिंदे उतरणार मैदानात; शरद पवारांच्या उपस्थितीत ‘या’ दिवशी भरणार उमेदवारी अर्ज