न्हावरे -मूळचे उरळगाव (ता. शिरूर) येथील असलेले व सध्या शिरूर येथील प्रितम-प्रकाशनगर येथे वास्तव्यास असलेल्या 41 वर्षीय शिक्षकाचा तपासणी अहवाल (दि. 12) पॉझिटिव्ह आल्याची माहिती निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी इंदिरा डॅनियल यांनी दिली.
संबंधित शिक्षकावर लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी या शिक्षकाला अस्वस्थ वाटल्याने त्याने एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले. उपचारादरम्यान त्या शिक्षकामध्ये काही लक्षणे आढळली.
त्यामुळे शिक्षकाला चाचणी करण्याचा सल्ला दिला. स्वॅब तपासणीत त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित शिक्षकाने लग्न समारंभ व दशक्रिया विधी याठिकाणीही हजेरी लावली आहे.