देशांत दिवसांत नवे 29 हजार बाधित

नवी दिल्ली : देशात रविवारी एका दिवसांत 28 हजार 637 नवे करोना बाधित आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या साडे आठ लाखाच्या घरात पोहोचली. त्यातील दोन लाख 92 हजार 258 सक्रिय बाधित असून बरे झालेल्यांची संख्या पाच लाख 34 हजार 621 आहे. तर मृतांची संख्या 22 हजार 674 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान हे करोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. राज्यातील बाधितांची संख्या दोन लाख 46 हजारवर पोहोचली असून एक लाख 36 हजार 985 जण बरे झाले आहेत.

देशांत बरे झालेल्यांचे प्रमाण 62.92 टक्के असून सक्रियांचे प्रमाण 10.22 टक्के आहे.11 जुलैपर्यंत एक कोटी 15 लाख 87 हजार 153 चाचण्‌या घेण्यात आल्या. तर 11 तारखेला एका दिवशी दोन लाख 80 हजार151 चाचण्या घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.