पिंपरी-चिंचवड शहरात बाधितांचा आकडा 45 हजार पार

दिवसभरात 1061 जणांना करोनाची बाधा तर 11 जणांचा मृत्यू

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाने हाहाकार उडविला असून आज शहरातील बाधितांच्या संख्येत पुन्हा मोठी भर पडली. आज दिवसभरात तब्बल 1142 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून दिवसभरात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या बाधितांमध्ये शहरातील 1105 जणांचा तर शहराबाहेरील 37 जणांचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 45 हजार 510 वर पोहोचली आहे. जर मृतांची संख्या 1023 इतकी झाली आहे.

बुधवारी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (गुरुवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 1105 जणांना तर शहराबाहेरील 37 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर गेल्या 24 तासांत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 10 जण शहरातील असून 1 जण शहराबाहेरील आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 850 वर पोहोचला असून शहराबाहेरील 173 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने हजारी पार करत 1023 ची संख्या आज गाठली आहे.

आतापर्यंत शहरातील 31 हजार 863 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 1768 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 727 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 2501 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयीत असलेले 3683 जण महापालिकेच्या रुग्णांलयांमध्ये दाखल झाले आहेत. तर शहरातील 5087 आणि शहराबाहेरील 728 जणांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.