पुणे – एका बाजूला करोना संसर्ग झालेल्यांची संख्या शेकडोने वाढत असताना दुसरीकडे उपचारानंतर बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. उपचारानंतर घरी गेलेल्यांची संख्या 10 हजार 451 इतकी आहे. ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या भागातील सर्वाधिक रुग्ण म्हणजे 1,665 बरे होऊन घरी गेले आहेत.
येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 968, कसबा-विश्रामबागवाडरा-927, भवानी पेठ-834, शिवाजीनगर-घोले रोड-756, वानवडी-रामटेकडी- 623, बिबवेवाडी-522, सिंहगड रस्ता-460, हडपसर-मुंढवा-378, धनकवडी-सहकारनगर-348, नगररस्ता-वडगांवशेरी-327, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 276 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, असे प्रशासनाने सांगितले.
पर्वती-नवीपेठ भागात सर्वाधिक बाधित
करोना बाधितांची सर्वाधिक संख्या सध्या प्रभाग 29- नवी पेठ-पर्वती येथे वाढत असून, येथे सर्वाधिक 534 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सुरूवातीला भवानीपेठ, ताडीवाला रस्ता या परिसरात सर्वाधिक बाधित रुग्ण सापडले होते. मात्र आता येथील रुग्णसंख्या कमी झाली असून, वेगवेगळ्या प्रभागात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
क्षेत्रीय कार्यालयानुसार ऍक्टिव्ह रुग्ण
कसबा-विश्रामबागवाडा – 845
शिवाजीनगर-घोले रस्ता – 496
हडपसर-मुंढवा – 491
सिंहगड रस्ता – 483
वानवडी-रामटेकडी – 406
धनकवडी-सहकारनगर – 368
भवानी पेठ – 363
ढोलेपाटील रोड – 362
बिबवेवाडी – 360
येरवडा-कळस – 334
कोथरूड-बावधन – 319
वारजे-कर्वेनगर – 294
औंध-बाणेर – 203
नगररोड-वडगांवशेरी – 188