श्रीनगर – जम्मू-काश्मीर येथील सोपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये एक जवान आणि एक नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
सोपोरमध्ये निगराणी करणाऱ्या सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. भारतीय जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये चार जवान आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोन जवानांची प्रकृती गंभीर आहे.
Terrorists attacked a naka party at Model town in Sopore. Injuries to some Central Reserve Police Force (CRPF) jawans and a civilian reported. Area cordoned off and search operation started: Dilbag Singh, DGP Jammu & Kashmir Police (file pic) https://t.co/uAVm7DG5Bu pic.twitter.com/ZhwoZ5tLUy
— ANI (@ANI) July 1, 2020