नगर -जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असून, आज तब्बल 782 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 30 हजार 797 वर पोहचली आहे. दरम्यान, आज 719 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 26 हजार 156 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 84.93 टक्के इतके झाले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 163, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 336 आणि अँटिजेन चाचणीत 283 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 23, संगमनेर 1, राहाता 2, पाथर्डी 5, नगर ग्रामीण 29, श्रीरामपूर 1, कॅन्टोन्मेंट 2, नेवासे 20, श्रीगोंदा 11, पारनेर 14, शेवगाव 24, कोपरगाव 25 आणि जामखेड 6, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 336 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 84, संगमनेर 7, राहाता 76, पाथर्डी 15, नगर ग्रामीण 23, श्रीरामपूर 18, कॅन्टोन्मेंट 4, नेवासे 15, श्रीगोंदा 7, पारनेर 32, अकोले 2, राहुरी 40, शेवगाव 5, कोपरगाव 6, जामखेड 1 आणि कर्जत 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 283 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 41, संगमनेर 1, राहाता 27, पाथर्डी 15, श्रीरामपूर 1, श्रीगोंदा 41, पारनेर 28, अकोले 11, राहुरी 30, शेवगाव 18, कोपरगाव 22, जामखेड 21 आणि कर्जत 27, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज 719 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 309, संगमनेर 6, राहाता 32, पाथर्डी 13, नगर ग्रामीण 57, श्रीरामपूर 24,कॅन्टोन्मेंट 7, नेवासे 6, श्रीगोंदा 22, पारनेर 34, अकोले 4, राहुरी 33, शेवगाव 73, कोपरगाव 43, जामखेड 21, कर्जत 24 आणि मिलिटरी हॉस्पिटल 11 अशा रुग्णांचा समावेश आहे.
नगर करोना अपडेट
बरे झालेली रुग्ण संख्या : 26,156
उपचार सुरू असलेले रूग्ण : 4,164
आजपर्यंतचे मृत्यू : 477
एकूण रूग्ण संख्या : 30,797