पिरंगुट -मुळशी तालुक्यातील करोनाबाधित रुग्ण संख्येने आठशेचा टप्पा पार केला आहे. तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 801 झाली आहे. आज नव्याने 18 रुग्णांची नोंद झाली आहे.
यामध्ये माण तीन, जांबे तीन, मारुंजी एक, घोटावडे दोन, नेरे एक, कासारसाई एक, म्हाळुंगे दोन, सुस एक, अंबडवेट एक, कासारआंबोली दोन आणि भरेत एक रुग्ण सापडला आहे. 5 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, एकाची स्थिती चिंताजनक आहे.