मंचर (पुणे) –आंबेगाव तालुक्यात सोमवारी (दि. 31) नवीन 48 करोनाबाधित रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 1 हजार 85 झाली आहे. मंचर येथे सर्वाधिक 15 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
मंचर येथे 15, पारगाव 5, अवसरी खुर्द, पेठ, महाळुंगे पडवळ येथे प्रत्येकी 4, गावडेवाडी येथे 3, शेवाळवाडी, कळंब येथे प्रत्येकी 2, घोडेगांव, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, नांदुर, निघोटवाडी, पिंपळगाव खडकी, आमोंडी, चांडोली बुद्रुक, जारकरवाडी येथे प्रत्येकी एक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 85 झाली आहे. 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 646 रुग्ण बरे झाले असून 408 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.