- अतिक्रमण विभागाची कारवाई
पिंपळे गुरव – करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने पथारीवाले, हातगाडीवाले, टपरीवाले यांना परवानगी दिली नाही. परंतु शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर हातगाडीवाले व्यवसाय करताना दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांची गर्दी होत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पिंपळे गुरव परिसरात रविवारी कारवाई करण्यात आली.
अनलॉक केल्यापासून शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना करोनाचे भय राहिले नाही. त्यामुळे बाजारपेठांमध्ये ग्राहक खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून रस्त्याच्या कडेला व पदपथावर भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते आदी प्रकारच्या हातगाड्या रस्त्याच्या कडेला लावण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी रस्त्यांवर गर्दी होत आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौक ते मयूरनगरी येथे शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातगाड्यांवर कारवाई करून येथील भाजीपाला, फळे आदी सामग्री जप्त करण्यात आली.
या प्रसंगी महापालिका अतिक्रमण विभागाचे सहायक निरीक्षक अरुण सोनकुसरे, महापालिका कर्मचारी, सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.