नवी दिल्ली : भारतातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 649वर जाऊन पोहोचली. दरम्यान मुंबईत एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू गुरूवारी दुपारी झाला. त्यामुळे मृतांची संख्या 14 वर जाऊन पोहोचली. गुजरात, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात एक बळी नोंदवण्यात आला.
केंद्र सरकारच्या यादीत प्रथमच गोव्याचे नाव नोंदवले गेले. तेथे 33 बाधित असल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत चार जणांचे प्राण गेले आहेत. गुजरातमध्ये दोन, मध्यप्रदेश, तामिळनाडू, बिहार, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये नोंदवला आहे.
सध्या प्रत्यक्ष कोरोनाचे बाधित असणारे 593 असून 42 जण या संसर्गापासून बरे झाले आहे. बाधितांमध्ये 47 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.