मुंबई : राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत आज आणखी भर पडली. राज्यात नव्याने 121 रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले असून एकूण संख्या 2 हजार 455 इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यापैकी मुंबई 92, नवी मुंबई 13, रायगड 1, ठाणे 10 आणि वसई-विरारमध्ये 5 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील 755 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी 50 जण कोरोना बाधित आढळले आहेत.
यापैकी लातूरमध्ये 8, यवतमाळ येथे 7, बुलढाणा जिल्ह्यात 6 , मुंबईत 14 तर प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर मनपा आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील 6 जण अहमदनगर येथे तर 1 जण पिंपरी चिंचवड येथे करोनाबाधित आढळले आहेत.