-->

केरळमधील करोनाबाधितांची संख्या पोहचली 126 वर

थिरूवनंतपूरम:  केरळमध्ये गुरूवारी आणखी 19 करोनाबाधित आढळले. त्यामुळे त्या राज्यातील रूग्णांची संख्या 126 इतकी झाली आहे. देशातील पहिले 3 करोनाबाधित केरळमध्येच आढळले होते. त्या बाधितांमध्ये चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. ते तिघेही नंतर करोनामुक्त आढळले. त्यामुळे केरळला मोठाच दिलासा मिळाला होता.

मात्र, मागील काही दिवसांपासून त्या राज्यातील करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली आहे. त्यातून ते राज्य जणू करोनाबाधितांच्या सर्वांधिक संख्येबाबत महाराष्ट्राशी स्पर्धा करत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केरळ सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्या राज्यात 1 लाख 20 हजारहून अधिक लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.