मुंबई -महाराष्ट्रात बुधवारी आणखी 9 हजार 211 करोनाबाधित आढळले. त्यामुळे राज्यातील बाधित संख्येने 4 लाखांचा टप्पा ओलांडला. दरम्यान, दिवसभरात 7 हजार 478 बाधित करोनामुक्त झाले.
देशात सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात करोना संसर्गामुळे आणखी 298 बाधित दगावले. त्यामुळे राज्यभरात करोनाबाधेने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 14 हजार 463 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 1 लाख 46 हजारांहून अधिक सक्रिय बाधित आहेत. तर आतापर्यंत सुमारे 2 लाख 40 हजार बाधित करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत राज्यातील सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद झाली आहे. त्या शहरात सुमारे 1 लाख 12 हजार बाधित आहेत.
मुंबईत करोनाने आतापर्यंत 6 हजार 247 बाधितांचा बळी घेतला आहे. राज्यभरात 20 लाखांहून अधिक करोनाविषयक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यात सुमारे 9 लाख लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर 40 हजारांहून अधिक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.