शहराचा पुढील आमदार भाजपचाच होईल : वसंत लोढा

नगर  -भाजपला येणारे दिवस फार चांगले आहेत. नगर शहरात भाजपने नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, खासदार, राज्य व केंद्रीय मंत्री आदी लोकप्रतिनिधी दिले आहेत. मात्र, शहराचा आमदार अद्याप भाजपचा झालेला नाही. ही सल वर्षानुवर्ष मनात आहे. शहरात अनुकूल वातावरण असल्याने भाजपच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे.

शहराचा पुढील आमदार भाजपचाच होईल अशी, महत्वकांक्षा शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बाळगावी, असे प्रतिपादन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी केले. पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने शहर भाजपच्या नूतन कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार पतसंस्थेच्या कार्यालयात करण्यात आला. प्रा. मधुसूदन मुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे सचिव विकास पाथरकर, ज्येष्ठ सभासद एल.जी. गायकवाड आदींच्या हस्ते शहराजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, नूतन ग्रामीण जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, शहर संघटन सरचिटणीस ऍड. विवेक नाईक, उपाध्यक्ष सुधीर पगारिया, सचिन पारखी, संतोष गांधी, शिवाजी दहींडे, तुषार पोटे, महेश नामदे, युवामोर्चा अध्यक्ष महेश तवले, महिला आघाडी अध्यक्षा अंजली वल्लाकट्टी व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

गंधे म्हणाले, शहर भाजपची कार्यकारणी निवडतांना सर्वांशी सल्लामसलत करून प्रत्तेक घटकाला कार्यकारणीत स्थान दिले आहे. पक्षात जो चांगले काम करतो त्याच्या कामाची दखल पक्ष कायमच घेत असतो. त्यामुळेच तुम्हाला हे पद मिळाले आहे. पंडित दीनदयाळ पतसंस्था परिवाराने केलेला सत्कार हा प्रोत्साहन देणारा आहे.

प्रा. मधुसूदन मुळे म्हणाले, देशातील सर्त्वत मोठ्या राजकीय पक्षाचे तुम्ही पदाधिकारी झालात याचा अभिमान बाळगा. ज्येष्ठांचा विचार घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे. सूत्रसंचलन नरेंद्र श्रोत्री यांनी केले. आभार विवेक नाईक यांनी मानले. यावेळी अमित गटणे, हुझेफा शेख, ओंकार पठाडे, उमेश साठे, आशिष अनेचा, अमोल निस्ताने, विलास गांधी, जहिरऊद्दिन सय्यद, राम वडागळे, डॉ. विलास मढीकर, प्रद्युम्न जोशी, अशोक सरनाईक, प्रा. संजय धोपावकर, बंटी डापसे, बाळासाहेब खताडे आदींचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.