एकच चिंतन अब्ज मनांचे, पुन्हा अवतरणार राज्य श्रीरामांचे

भूमिपूजनाची झाली तयारी येते प्रभू श्रीरामांची स्वारी

वैभवशाली वारशात आणखी भर
देवदेवता आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या भारतभूमीला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणामुळे या सांस्कृतिक वैभवशाली ठेव्यात आणखी मोलाची भर पडणार आहे. रामजन्मभूमीचा पायाभरणी समारंभ आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी प्रत्येकजण आतूर आहे. करोनाच्या आजारामुळे आपण हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करू शकत नाही. मात्र प्रत्येकाने घराबाहेर रांगोळी काढून, पणत्या लावून, देवदेवतांना गोड नैवेद्य दाखवून आजचा दिवस “सण’ म्हणून साजरा केला पाहिजे. हा उत्सव सगळ्यांनी साजरा केला पाहिजे. तरच येणाऱ्या पिढीला आपला वैभवशाली इतिहास माहिती होईल.
– सुरेश भोईर, नगरसेवक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका


जे बोलतो ते करतोच
370 वे कलम रद्द करणे, समान नागरी कायदा आणणे आणि राम मंदिर उभारणे या तीन आमच्या पक्षाच्या (भाजप)च्या प्रमुख घोषणा होत्या. ज्याच्यासाठी भाजपने आजपर्यंत लोकांना आश्‍वासित केले होते. त्यापैकी 370 वे कलम हटवले गेले आणि आता राम मंदिर उभारणीस शुभारंभ याचाच अर्थ भाजप जे बोलतो ते करतोच.

– राजु दुर्गे, मा.नगरसेवक जिल्हा सरचिटणीस, भाजपा पिं.चिं.शहर (जिल्हा)


“रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे…’

देशाच्या राजकारणात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दिलेली ही घोषणा आता प्रत्यक्षात येताना दिसणार आहे. मंदिर जनतेच्या पैशातून निर्माण होणार असून ते देशाला एक चांगली दिशा देणारे ठरणार आहे.
– अमित गोरखे, प्रदेश मंत्री (सचिव) भाजपा महाराष्ट्र


 

हा देशाचा आणि धर्माचा विजय
राममंदिर हा संपूर्ण हिंदू धर्माचा जिव्हाळ्याचा विषय आहे. 500 वर्षांपासून त्याचा वाद सुरू होता. आता भाजप सरकारच्या काळात नरेंद्र मोदींच्या काळात हा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. हा देशाचा आणि धर्माचा विजय झाला आहे. सर्व भारत देश या निर्णयामुळे आनंदित झाला आहे.
– रवि लांडगे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका


हा देशाचा आणि धर्माचा विजय
राममंदिर हा संपूर्ण हिंदू धर्माचा जिव्हाळ्याचा विषय आहे. 500 वर्षांपासून त्याचा वाद सुरू होता. आता भाजप सरकारच्या काळात नरेंद्र मोदींच्या काळात हा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. हा देशाचा आणि धर्माचा विजय झाला आहे. सर्व भारत देश या निर्णयामुळे आनंदित झाला आहे.
– रवि लांडगे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका


 

अनेक वर्षांच्या संर्घषाचा समारोप
अयोध्येतील राम मंदिराबाबत शेकडो वर्षापासून लढा सुरू आहे. अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्‍न लोकांच्या भावनेशी जोडला गेला होता. यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी उभारलेल्या जनआंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या लढ्यात हजारो कारसेवकांनी तुरूंगवास भोगला तर शेकडो जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक वर्षांच्या संघर्षाचा समारोप झाला आहे. रामजन्मभूमी पूजनासाठी भाजपने टाकलेले हे पाऊल हिंदू धर्मियांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करणारे आहे. भाजपची पदाधिकारी म्हणून मला माझ्या पक्षाचा आणि नेत्यांचा सार्थ अभिमान आहे. फक्‍त आता राममंदिराच्या निर्माणाचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी तमाम हिंदू बांधवाची इच्छा आहे.
– तेजस्वीनी कदम, भाजपा युवती प्रमुख, पिंपरी – चिंचवड शहर सदस्य – चित्रपट महामंडळ महाराष्ट्र शासन


हिंदू बांधवानी गुढ्या, तोरणे उभारावी
आज अयोध्येत रामजन्मभूमी येथे मंदिर उभारणीचे भूमिपूजन होणार आहे. यामुळे हिंदू बांधवांनी गुढ्या उभारून भगवी पताका लावावी. घरासमोर रांगोळी काढून दरवाजावर तोरण लावावे. आजच्या दिवसामुळे हिंदूंमध्ये नवचैतन्य आले असून त्याचा सकारात्मक परिणाम आगामी काळात हिंदुस्थानाच्या प्रगतीत नक्‍कीच दिसून येईल, अशी अपेक्षा आहे.

– वसंत बोराटे, नगरसेवक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


मंदिराचे निर्माण अभिमानास्पद
आपण हिंदू आहोत, त्यामुळे अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण होणे हा आमला स्वाभिमान आणि अभिमान आहे. या राममंदिराच्या निर्माणासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला आहे. भविष्यात तो कायम ठेवला पाहिजे. राममंदिर हा प्रत्येकाच्या भावनेचा विषय झाला असल्याने रामजन्मभूमीचे पूजन झाल्यावर मंदिराचे निर्माण लवकरात लवकर झाले पाहिजे.
– निलेश बोराटे, युवा नेते


पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व
राम मंदिर भूमिपूजनासाठी 5 ऑगस्ट हा दिवस वास्तुशास्त्रानुसार शुभ मुहूर्त आहे. तसेच या दिवसाला पौराणिक आणि आधुनिक भारताच्या इतिहासात देखील महत्व आहे. राम मंदिर निर्माण हा एक सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा विषय आहे. हा तिढा सोडविण्यात भाजपसह सर्व हिंदूत्ववादी संघटनांचा मोलाचा वाटा आहे.
– माऊली थोरात, नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका


राम मंदिरामुळे समरस समाजाचे निर्माण
अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी शेकडो वर्षांचा लढा कामी आला आहे. रामलल्लाच्या जागेवर न्यायालयाने शिक्‍कामोर्तब केले आहे. यामुळे सर्व समाजातील दरी दूर होऊन समरस समाजाचे निर्माण होईल. सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करणारे सर्व लोक भव्य मंदिराच्या निर्माणाला पाठिंबा देत आहेत. मंदिराचे निर्माण हा एकजुटीचा विजय आहे.
– सचिन चिंचवडे, नगरसेवक मा. उपमहापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


मंदिराच्या निर्माणातून मित्रत्त्वाचा संदेश
श्रीराम हे मर्यादा पुरूषोत्तम असून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आमच्या आचरणाचे ते मानदंड आहेत. मंदिराच्या निर्माणामुळे प्रभू श्रीराम यांची मित्रता, याचाही संदेश सर्वत्र जाईल. अहंकार आणि आसुरी शक्‍तीचे नामोनिशाणही उरणार नाही. मंदिराच्या निर्माणामध्ये हिंदूत्ववादी संघटनांची भूमिका महत्वाची आहे. अयोध्येतील राममंदिर हिंदू एकतेचे प्रतीक आहे.
– शैलेश मोरे, नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका


प्रभू श्रीराम आमच्या श्रद्धेचा विषय
राम मंदिराबाबत अनेक मतमतांतरे असली तरी प्रभू श्रीरामचंद्र हे आमच्या श्रद्धेचा विषय आहेत. वादग्रस्त जागा आता रामलल्लाची असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता भव्य राममंदिर बांधण्यासाठी समस्त हिंदू समाज एकवटला आहे. भव्य मंदिराचे निर्माण आता होणारच ही काळ्या दगडावरील रेष आहे.
– तुषार सहाणे, विश्‍वस्त श्री मार्तंड देवस्थान, जेजुरी


भव्य मंदिराचे निर्माण व्हावे हीच इच्छा
राम मंदिर ही देशाची अस्मिता असून आणि राम ही भूमिका आहे. हिंदुस्थानात राम मंदिरास उशीर होणे ही दुर्दैवी बाब आहे. आता न्यायालयाने त्यावर हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला आहे. यामुळे आता राम मंदिराचे निर्माण सुरू झाले आहे. जे कारसेवेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते, त्यांच्या मेहनतीचे व बलिदानाचे हे फळ आहे. आता हे मंदिर भव्य आणि दिव्य व्हावे, हीच प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना.
– सुमेध चपळगावकर, रामभक्त


सामाजिक दृष्ट्या भावनिक विषय
राममंदिर हा विषय राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत भावनिक आहे. भारतीय जनता पार्टी यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी हा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आणत जिवंत ठेवला आहे. न्यायालयानेही रामलल्लांच्या जागेवर शिक्‍कामोर्तब केले आहे. यामुळेच अयोध्येत रामाच मंदिर साकारल जात असून मला माझ्या पक्षाचा सार्थ अभिमान आहे. याच दिवसाची हिंदू समाज वाट पहात होता.
– कुंदन गायकवाड, नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका


अयोध्येतील ही तिसरी दिवाळी असणार
अयोध्येत तिसऱ्यांदा दिवाळी साजरी होणार आहे. पहिली दिवाळी प्रभू श्रीराम वनवासातून परतल्याच्या निमित्तानं साजरी केली जाते. तर दुसरी दिवाळी न्यायालयाने रामाच्या पक्षात निर्णय दिल्यानंतर साजरी केली गेली. आता राम मंदिर भूमिपूजनाच्यावेळी तिसरी दिवाळी साजरी केली जाईल. राम मंदीर हा हिंदूच्या अस्मितेचा प्रश्‍न असून कोणत्या जाती-धर्माविरोधाने नाही. भूमिपूजन सोहळा आनंदाचा क्षण आहे.
– केशव घोळवे, नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका


प्रत्येक हिंदूच्या ह्रदयात श्रीराम
आज प्रत्येक हिंदूच्या ह्रदयात प्रभू श्रीरामचंद्र वसलेले आहेत. पवित्र श्रावण महिन्यात श्रीराम मंदिराचे पूजन व्हावे हा अनोखा योगायोग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हा सुवर्णयोग आला आहे. कारसेवेत बलिदान केलेल्या सर्वांचे हे योगदान आहे. त्यामुळे माझ्या पक्षाचा आणि नेत्यांचा मला अभिमान आहे. आता मंदिर कधी पूर्ण होणार याची आस सर्वांनाच लागलेली आहे.
– शांताराम (बापू)भालेकर, मा. नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका


धर्माला श्रद्धा आणि परंपरेचाही आधार
अयोध्येतील राममंदिर आणि हिंदूंच्या भावना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या परंपरेला धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यता आहे. कोणताही धर्म फक्त अधिकारांवर चालत नाही. त्याला परंपरा आणि श्रद्धांचाही आधार असतो. यामुळे प्रत्येकाने आजचा दिवस सण म्हणून साजरा केला पाहिजे. यातूनच आपल्या देशाची एकता दिसून येणार आहे.
– सौ. कमल घोलप, नगरसेविका, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका


कोट्यवधी भारतीय या क्षणाची वाट पहात आहेत
आज अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. आज कोट्यवधी हिंदू बांधव या क्षणाची कित्येक वर्षांपासून वाट पाहत आहेत. आज हे स्वप्न साकार होत असल्याना खूपच आनंद होत आहे. करोनाच्या आजारामुळे अनेकांना आज इच्छा असूनही या कार्यक्रमात सहभागी होत येत नाही. मात्र टिव्हीवरील हा सोहळा प्रत्येकजण आपल्या डोळ्यात साठवून ठेवणार आहे.
– काळुराम बारणे, शहर उपाध्यक्ष भाजप, पिंपरी – चिंचवड


प्रत्येक घरात आनंदोत्सव साजरा करावा
राम मंदिराचे निर्माण हे स्वप्न देशातील प्रत्येक हिंदूंच्या मनात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि साधूसंतांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमीची पहिली वीट रचण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक घरात आनंदोत्सव साजरा करावा. घरावर भगवी पताका लावावी. एक रामभक्‍त आणि हिंदुत्ववादी म्हणून माझे प्रत्येक हिंदुला हेच आवाहन आहे. जय श्रीराम…
– कुणाल साठे, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, पुणे जिल्हा संयोजक


माझे वडील पै. ज्ञानेश्‍वर शेडगे हे 1992 साली झालेल्या कारसेवेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना अयोध्येत अटकही झाली होती. ते कधी सुटणार याबाबत निश्‍चित माहिती मिळत नसल्याने त्यावेळी आमचे कुटुंब अत्यंत तणावाखाली होते. आता प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराचे निर्माण होणार आहे. ही आमच्यासाठीच नव्हे तर तमाम हिंदू बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
– ऍड. मोरेश्‍वर शेडगे, नगरसेवक, पिंपरी -चिंचवड महानगरपालिका


आणखी एक स्वप्न साकार झाले
अयोध्येत भव्य राम मंदिराचे निर्माण करणे, हे स्वप्न तमाम हिंदू बांधवांनी पाहिले होते. आज ते स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असल्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात हे सर्व घडत असल्याने मी भाजपचा पदाधिकारी म्हणून मला त्याचा अभिमान आहे. या दिवसाची इतिहासात नोंद झाल्याशिवाय राहणार नाही. जगाला हेवा वाटेल असे मंदिराचे निर्माण व्हावे, ही प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना.
– शितल उर्फ विजय शिंदे, नगरसेवक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका


मंदिराचे निर्माण अभिमानास्पद
अयोध्येत श्रीरामांचे भव्य आणि ऐतिहासिक मंदिराच्या उभारणीसाठी आज भूमीपूजन सोहळा संपन्न होणार आहे. राममंदीर होणे म्हणजे भारताच्या राष्ट्रीय आत्मसन्मानाची पुर्नर्स्थापना होणे. रामराज्य ही भारतीय सुशासनाच्या आदर्शांची संकल्पना आहे. त्या दृष्टीने बघितले तर आध्यात्मिक, राजकीय लोकशाही सामाजिक न्याय व समता समरसता आणि लोहसहभाग आदी भारतीय मूल्यव्यवस्थेची आपणच आपल्याला आठवण करून देण्याचा हा ऐतिहासिक प्रसंग आहे.
– प्रा. उत्तम केंदळे, नगरसेवक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका


अयोध्येचा उल्लेख ऐतिहासिक प्रवास वर्णनामध्येही
अयोध्या हे प्रभू श्रीरामचंद्र यांचे जन्मस्थान आहे, असा उल्लेख ऐतिहासिक प्रवास वर्णनांमध्ये आहे. आता तर ते न्यायालयानेही मान्य केले आहे. हिंदूंच्या या आस्थेबाबत कोणताच वाद आता राहिलेला नाही. कोणत्याही देवावरची भक्ती ही त्या व्यक्तीची वैयक्तिक भावना असते. म्हणूनच अयोध्येतील राममंदिर हा आमच्या आस्थेचा विषय आहे. सर्वांनाच आता भव्य मंदीराची उभारणी झालेली पाहायची आहे.
– सदाशिव खाडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य, भाजपा महा. मा. अध्यक्ष – पिंपरी – चिंचवड नवरगर विकास प्राधिकरण


राम मंदिरामुळे हिंदुची मान उंचावली
भव्य राम मंदिराची उभारणी हा कोणत्या जाती-धर्मा विरूद्धचा विषय नाही. त्यामध्ये आमच्या हिंदू धर्माची अस्मिता आहे. आज होणाऱ्या भूमिपूजनामुळे समस्त हिंदू बांधवांची मान अभिमानाने उंचावली आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची अनेकांची इच्छा होती. मात्र करोनामुळे ते शक्‍य नाही. यामुळे प्रत्येक हिंदूनी आपल्या सणाप्रमाणे आपल्या घरासमोर रांगोळी काढावी. सायंकाळच्यावेळी पणत्या लावाव्यात. घरामधील देवदेवातांची आरती करावी आणि त्यांना गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. लहान मुलांना आजच्या दिवसाचे महत्व समजावून सांगावे.
– कुणाल लांडगे, जिल्हा सरचिटणीस, भाजपा पिं.चिं.शहर-जिल्हा 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.