मुंबई – सलमान खानचा पॉप्युलर रियॅलिटी शो “बिग बॉस 15′ नवा सीजन आज पासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनोरंजन, भांडण, ड्रामा अन् बरंच काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
‘बिग बॉस 15’ सिझनची घोषणा होताच दिवसागणिक प्रेक्षकांच्या मनात शो बद्दल उत्सुकता वाढताना दिसत होती. मात्र, आता ही प्रतीक्षा संपणार आहे.
View this post on Instagram
शो सुरू होण्यासाठी आता फक्त एक दिवस शिल्लक आहे. नेहमीप्रमाणे, यावेळीही स्पर्धक घराच्या आत कैद होतील, त्यांचा बाहेरील जगाशी कोणताही संबंध नसेल. शनिवार 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजता बिग बॉस 15 चा प्रीमियर असणार आहे.
View this post on Instagram
नेहमी प्रमाणे बॉलिवूडचा भाई जान या कार्यक्रमाचे सूत्रसंचान करताना दिसेल. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉसचा प्रोमो रिलीज करण्यात आला. या प्रोमोमध्ये सलमान एका घनदाट जंगलात वावरताना दिसतोय. सलमान खानच्या एंन्ट्रीने चाहते देखील आनंदित झाले आहेत.