पुणे – पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असताना आज पोलीस उपनिरीक्षकानेच तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जाच्याकडून रक्षणाची अपेक्षा आहे तोच असे करत असेत तर पुणेकरांनी कुणाकडे जायचं अशा प्रश्न आता उपस्थीत झाला आहे.
युवतीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जर्दे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका युवतीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जर्दे सध्या येरवडा वाहतूक विभागात उपनिरीक्षक म्हणून नियुक्तीस आहे. जर्दे कोथरूड पोलीस ठाण्यात नियुक्तीस होता. २०१८ मध्ये एका ब्युटीपार्लरमध्ये काम करणाऱ्या युवतीबरोबर त्याची ओळख झाली होती. जर्दे विवाहित आहे. विवाहित असताना त्याने मला विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केला, असे युवतीने फिर्यादीत म्हटले आहे.