मुंबई – कर्नाटकने देशाला एक संदेश दिला आहे की भाजपला हरवता येऊ शकते. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले. डाव्या आघाडीचे डी. राजा यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले की, कर्नाटकसारखी परिस्थिती इतर राज्यात निर्माण होऊ शकते यासाठी मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. अनेक राज्यात सिंगल पक्ष आहेत,
त्यामुळे कॉंग्रेसने कर्नाटकमध्ये शक्ती दाखवून भाजपविरोधात जिंकली त्याचप्रमाणे इतर राज्यात किमान समान कार्यक्रम घेऊन जनतेत जाणार असल्याची माहिती देखील शरद पवार यांनी दिली.
कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पराभव करता येऊ शकतो, यासाठी विरोधकांची एकत्रित मोठ बांधण्याची गरज आहे, यासाठी शरद पवार यांनी निर्धार केला आहे.