रूपीनगर – रूपीनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने आज (रविवारी, दि. 24) सुमारे २५ लहान मुलांचे लचके तोडले आहेत. गेल्या चार दिवसांपासून एक पिसाळलेला कुत्रा या परिसरात फिरत असून, कुत्र्याने याठिकाणी उच्छाद मांडला आहे.
लहान मुले घराच्या अंगणात खेळत असताना त्यांच्यावर झडप घालून कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यामुळे तात्काळ झखमी मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.