वैद्यकीय सेवक खरचं ‘करोनायोद्धे’; विश्वजीत कदम यांनी पीपीई किटसह अनुभवला डॉक्टरांचा ‘लढा’

पुणे – करोना संसर्गाविरोधातील युद्धामध्ये प्रयत्नांची शर्थ करून रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय सेवकांना कोरोनायोद्धे का म्हणतात, याचा प्रत्यय आला. युद्धभूमीवर अर्थात प्रत्यक्ष रुग्णालयात गेल्यावर हे समजतं, असा अनुभव राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.

पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये थेट करोना वॉर्डात जाऊन डॉक्टर, नर्सेस आणि रुग्णांसमवेत संवाद साधला. साधारण ४० ते ४५ मिनिटे या वॉर्डात मी पीपीई किट घालून होतो. अक्षरशः श्वास कोंडल्यासारखी अवस्था होत होती. मी घामाने पूर्ण भिजलो होतो. मग या रुग्णांची सेवा करताना बारा-बारा तास पीपीई किट घालून हे करोना योद्धे कसे काम करत असतील, याची कल्पनाच केलेली बरी, असं डॉ. कदम यांनी म्हटलं.

कुणाच्या घरी चिमुकली आपल्या आईची वाट पाहत असेल, तर कोणाचे कुटुंबीय काळजीने त्रस्त असतील. पण, या कोरोना विरोधातील लढाईत स्वतःच्या जिवाची, परिवाराची तमा न बाळगता या डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांचे सेवाकार्य गेले वर्षभर अथकपणे सुरू असल्याचे त्यांनी म्हटलं. तसेच पीपीई किटमधील देवदूतांच्या कार्याला माझा मनापासून सलाम, असंही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.