Big Breaking : इयत्ता १०वी ची परीक्षा रद्द!

मुंबई – राज्यातील करोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे.  नव्या बाधितांचा आकडा दररोज एक नकोसा विक्रम प्रस्थापित करत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याबाबतचा निर्णय विचाराधीन असून याबाबत मुख्यमंत्री ठाकरे लवकरच निर्णय घेणार असल्याचं कळतंय. अशातच आज शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे.

गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील इयत्ता १० वी च्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर दिली आहे.

इययत्ता १० वीची परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी १२ वी च्या परीक्षेबाबत याआधी घेण्यात आलेला निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. यानुसार इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निर्णय मे ,महिन्याच्या अखेरपर्यंत घेण्यात येईल.

निकाल कसा लागणार?

यावेळी मंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा रद्द झाल्यानंतर इयत्ता १०वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे काय होणार याबाबतही माहिती दिली. “दहावीच्या निकाल कोणत्या आधारावर दिला जाईल यासाठीच निकष व निकालाच्या घोषणेची तारीख  लवकरच जाहीर केली जाईल. शालेय शिक्षण विभाग “निष्पक्ष आणि अचूक” मूल्यांकन निकष तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे.” असं त्यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.