मुंबई – आपल्या राजकीय वक्तव्यांसाठी तसेच गाण्यांसाठी कायमच चर्चेत असणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. त्यांच्या गाण्यावरून किंवा विधानांवरून त्यांना नेहमीच सोशलवर मिडियावर ट्रोल केले जाते. मात्र, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी अमृता फडणवीस यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वादाला सुरुवात झाली आहे.
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष राज्यात पेटला आहे. नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. नवी मुंबईतही असाच निषेध मोर्चा होता त्यावेळी अशोक गावडे यांची जीभ घसरली.
ते म्हणाले. आतापर्यंतच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करतांना दिसल्या नाही, पण ‘ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते’ त्यांच्या या आक्षेपार्ह विधानाचा व्हिडिओ सध्या सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे. ते पुढे म्हणाले,’ मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कसे बोलावे असा प्रश्न विचारत अक्कलही काढली.’
दरम्यान, त्यांचा या आक्षेपार्ह विधानाचा सोशलवर मीडियावर निषेध होत असून भाजप नेत्यांनी अशोक गावडे यांच्या वक्तव्याचा भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे निषेध केला आहे.