मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरी बुधवारी ईडीनं छापेमारी करून त्यांना अटक केली. सध्या त्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. बुधवारी भल्या पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्या घऱी छापा टाकला होता. यानंतर नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले.
न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यानुसार ईडीचे अधिकारी कोठडीमध्ये नवाब मलिक यांची कसून चौकशी करत आहेत. मात्र, सुनावणी दरम्यान नवाब मलिक हे सहकार्य करीत नाहीत. उलट ईडीच्या अधिकार्यांना धमकावत असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांचा नवाब मलिक यांचा मुलगा फराज याला समन्स बजावणार असल्याची माहिती मिळाली आहे.