महायुतीत जाणार का? आदित्य ठाकरे म्हणाले,’तोपर्यंत भाजपाबरोबर जाणार …’

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीनंतर देशातील बहुतेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काँग्रेससोबत जातील, असे भाकित शरद पवार यांनी व्यक्त केल्यानंतर देशात पुन्हा एकदा विलीनीकरण या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची अर्धी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शरद पवार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे भाकित केले होते. यावरून राजकारण तापले असून राजकीय नेते प्रतिक्रिया देतांना दिसत आहे.
अशात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुतीत जाण्याच्या चर्चांवर आपली भूमिका मांडली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले,’जोपर्यंत भाजपाकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तोपर्यंत आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही.’ असं म्हणत ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
आदित्य ठाकरे माध्यमांला दिलेल्या मुलाखत पुढे म्हणाले,’देशातील लोकशाही भाजपला संपवायची आहे. जोपर्यंत भाजपाकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तोपर्यंत आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही,’ शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर देशातील बहुतेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अस विधान केलं होत यानंतर ठाकरे गट महायुतीत जाणार असल्याची चर्चा होती. या चर्चांवर आदित्य ठाकरे यांनी मुलाखतीत आपलं मत मांडल आहे.
हे वाचाल का ? चार टप्प्यातील मतदानानंतर भाजप किती जागा जिंकणार? अमित शहा यांनी दिलं ‘उत्तर’





