Amit Shah in West Bengal । केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी, पश्चिम बंगालमध्ये मुल्ला, मदरसा, माफियाचे नारे लागले आहेत. त्यामुळे याठिकाणी माफिया राज सुरु झाला असल्याची टीका त्यांनी केली.
पश्चिम बंगालमधील हुगळीत एका जाहीर सभेला संबोधित करताना भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की,काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आम्हाला पीओकेबद्दल बोलू नका, कारण पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, असे म्हणतात, मला सांगायचे आहे की तुम्ही पाकला घाबरा, आम्ही तर पीओके घेऊनच दाखवू”. असे म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला.
एक खडाही हलवायची हिंमत नाही Amit Shah in West Bengal ।
पुढे बोलताना, “हे लोक व्होट बँकेच्या राजकारणाची भीती असल्याने प्राण प्रतिष्ठाला गेले नाहीत. कलम ३७० हटवण्यास ममता दीदी आणि काँग्रेसचा विरोध असल्याचे अमित शहा म्हणाले. मी विचारल्यावर ते म्हणाले की रक्ताच्या नद्या वाहतील. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. रक्ताच्या नद्या तर सोडा, ५ वर्षे झाली आणि एक खडाही हलवायची हिंमत नाही.” असेही त्यांनी म्हटले.
‘बंगालमध्ये मुल्ला, मदरसा आणि माफियांचा नारा’ Amit Shah in West Bengal ।
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करताना अमित शाह म्हणाले की, ममता दीदी आमच्या हिंदू आणि बौद्ध निर्वासितांना नागरिकत्व देणार नाहीत, पण बांगलादेशी घुसखोरांना नक्कीच नागरिकत्व देतील. मी वचन देतो की या सर्व लोकांना नागरिकत्व दिले जाईल. माती, मानुषीचा नारा देत दीदी सत्तेवर आल्या होत्या आणि आज बंगालमध्ये मुल्ला, मदरसा, माफियाचा नारा लावला जात असल्याचे ते म्हणाले. इमाम आणि मुल्ला यांना बंगालच्या तिजोरीतून पगार द्यायचा का? हायकोर्टाने नकार दिल्यावर ममता दीदींनी बोर्डाला दिलासा दिला.