मुंबई – आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे मराठमोळी अभिनेत्री ‘सई ताम्हणकर’ मराठी रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘सई ताम्हणकर’कडे पाहिलं जातं. विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.
सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय हे सुद्धा सई तिच्या चाहत्यांना सांगत असते. दरम्यान, नुकतंच सईने आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही खास फोटो शेअर केले असून तिचा मादक अंदाज पुन्हा एकदा फॅन्सला तिच्याकडे आकर्षित करत आहे.
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सई ताम्हणकर हिने साडी काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. मात्र, या साडीत ती कमालीची हॉट दिसत आहे. तिने अतिशय बोल्ड पोज देत फॅन्सच्या नजरा स्वतःकडे वळवल्या आहेत. बोल्डनेसमुळे सई नेहमीच चांगलीच चर्चेत राहते. आणि आता देखील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असून, सध्या सगळीकडे तिच्या याच फोटोंची चर्चा होताना दिसत आहे.
दरम्यान, सई नुकतीच‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटात झळकली होती. 2 डिसेंबर 2022 रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. सई व्यतिरिक्त प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी या कलाकारांनी काम केले आहे.