अकलूज – अकलूज शहरामध्ये मुस्लीम बांधवांचा पवित्र सण ईद उल फित्र म्हणजे रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अकलूज शहरातील काझी मोहल्ला येथील मदिना मस्जिद येथे सुमारे दहा हजार मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले.
सकाळी आठ वाजता सुरू झालेला मेळावा जामा मस्जिद, आंबेडकर चौक, जुना बसस्टड मार्गे विजयचौकातून दर्गा मस्जिद सर्व मुस्लीम बांधव हे नारे तकबीर अल्लाहु अकबर अशी तकबीर म्हणत नारे देत अकलूज शहराच्या निरा नदिच्या काठिवर असलेल्या शाही ईदगाह मैदान येथे पोहचले.
अकलूज शंकरनगर, संग्रामगर, बागेची वाडी, विजय वाडी, आनंदगर, गिरझणी, कोडबावी ,चाकोरे, माळीनगर या गावासह परिसरातील मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले. दर्गा मस्जिदचे इमाम मौलाना जाकीरहुसेन साहब यांनी रमजान ईदचे नमाज पठण केले.
यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, डीवायएसपी बसवराज शिवपूजे, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, अकलूज पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.