वॉर्डांमध्ये मोहल्ला क्लिनिक सुरू
पुणे – खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीत करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे दि.12 ते 14 मेदरम्यान परिसर पूर्णतः लॉकडाऊन असेल. केवळ दूध विक्री आणि मेडिकल दुकानेच सुरू राहतील. नागरिकांना वैद्यकीय सुविधा आणि उपचार वेळेत मिळावेत, यासाठी वॉर्डांमध्ये मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.
गेल्या तीन-चार आठवड्यांपासून खडकी बाजार पूर्णतः बंद आहे. बाजारालगतच्या वॉर्डांची तीन किलोमीटर हद्दही कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, वॉर्ड क्रमांक-2 मध्ये पाच आणि 3 मध्ये चार मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. लवकरच वॉर्ड क्रमांक -1 आणि 7 मध्ये मोहल्ला क्किनिक सुरू करण्यात येणार आहे. या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी खासगी डॉक्टरांच्या सहकार्यातून करण्यात येत आहे, अशी माहिती बोर्डाच्या कार्यालयीन अधीक्षक सुजा जेम्स यांनी दिली.
दरम्यान, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतल आत्तापर्यंत 27 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.