मुंबई – छोट्या पाड्यावरील लोकप्रिय “द कपिल शर्मा शो’ नेहमीच कलाकारांचा हजेरीमुळे चर्चेत असतो. या शो मध्ये प्रत्येक बॉलीवूड कलाकार हजेरी लावत असून या शो ला भारतातच नव्हे तर जग भारतातील लोक आवडीने पाहत असतात. या शोच्या माध्यमातून अनेक बॉलीवूड सेलेब्स आपल्या चित्रपटाची जाहिरात करीत असतात. किंवा प्रोमोशन करीत असतात.
मात्र, आता लवकरच “द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सूत्रांच्या माहिती नुसार कपिल शर्मा एका महिन्यासाठी यूएस ट्रीपवर जाणार आहे. त्यामुळे तो जून महिन्यापर्यंत बिझी आहे. या ट्रीपमुळे शोचं शुटिंग होणं शक्य नाही. त्यामुळे हा शो अनिश्चित काळासाठी बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे हा काही दिवसांचा ब्रेक असल्याचं बोललं जात आहे. जेव्हा कपिल शर्मा भारतात परत येईल तेव्हा नव्यानं शोचं शूटिंग सुरू केलं जाणार आहे.
View this post on Instagram
या यूएस ट्रीप संदर्भातील एक अधिकृत पोस्टर देखील कपिलनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलं आहे. आपल्या या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या अमेरिका आणि कॅनडा ट्रीपबद्दल लिहिलं आहे. या ट्रीपमध्ये आपण खूप एन्जॉय करणार असल्याचंही त्यानं त्याच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच “द कपिल शर्मा शो’ हा लोकप्रिय कार्यक्रम काही काळासाठी प्रेक्षकांचा निरोप घेणार हे नक्की.