लंडन – ‘कोविड-19’ अर्थात ‘करोना’ व्हायरसच्या प्रभावामुळे जगभरच्या सर्वच क्रीडा स्पर्धांना फटका बसला आहे. त्यामुळे विविध क्रीडा स्पर्धा एकतर रद्द करण्यात आल्या आहेत अथवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) करोना विषाणू संसर्गामुळे 20 एप्रिलपर्यंतच्या सर्व स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. या स्पर्धाचे भविष्यात आयोजन करण्यात येईल आणि त्यांच्या तारखा लवकरच जाहीर होतील.
दरम्यान, करोनाने जगभरात घेतलेल्या बळींनी 5 हजार हा आकडा ओलांडला आहे. जगातील 133 देशांमध्ये करोना फैलावला आहे. त्या विषाणूच्या संसर्गामुळे मृत पावलेल्यांची संख्या चीनमध्ये सर्वांधिक नोंदली गेली आहे. त्याखालोखाल इटली आणि त्यानंतर इराणचा क्रमांक आहे.