बेंगळुरू – मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस उमरगा (umaraga) येथे आंदोलकांनी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून महाराष्ट्रासाठी बससेवा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय या कर्नाटकच्या परिवहन मंडळाने घेतला आहे. (Manoj Jarange patil)
सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.आपल्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरताना दिसत आहे.या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून आंदोलनकर्त्यांकडून सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय. अशात कर्नाटकची बस जाळण्याचा प्रकार घडला होता. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. (Maratha Reservatiuon)
ही बस बिदरमधील भालकी येथून पुण्याकडे जात असताना ही घटना घडली.आंदोलकांनी प्रवाशांना बसमधून उतरवून नंतर ही बस पेटवून दिली. बस मधील प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यासाठी त्वरीत पर्यायी व्यवस्था करण्यात आली. महाराष्ट्रातील आंदोलनाची स्थिती निवळेपर्यंत कर्नाटकची ही बस सेवा बंदच राहील असेही कर्नाटक परिवहन मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारकडून हालचालींना वेग
निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या असून १३ हजार ४९८ जुन्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या कुणबी नोंदी तपासण्याचे काम दररोज सुरु असून अशा नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यास देखील आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.