Anish Bhanwala in Asian Shooting Championship :- भारताचा स्टार नेमबाज अनिश भानवाला याने आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड पिस्तूल प्रकारात ब्रॉंझपदक पटकावले. या पदकासह त्याने आगामी पॅरिस ऑलिम्पिकचा कोटाही मिळवून दिला.
पॅरिसची पात्रता मिळवणारा भानवाला भारताचा 12 वा खेळाडू ठरला आहे. (Anish Bhanwala settles for in men’s 25m rapid fire pistol at the Asian Shooting Championship 2023) दक्षिण कोरियामधील चॅंगवोन येथे ही स्पर्धा सुरू आहे. भानवालाने पात्रता फेरीतच हा कोटा मिळवला. त्याने 588 गुणांची कमाई करताना तिसरे स्थान प्राप्त केले.
Anish Bhanwala of India 🇮🇳 wins Bronze🥉and Olympic Quota in Men’s 25m Rapid Fire Pistol at the 15th Asian Shooting Championship in Changwon, Korea. #indianshooting pic.twitter.com/evUuL1EuT4
— Shimon Sharif (@ShimonSharif) October 31, 2023
वॅंग शिनजी याने 589 गुणांसह पहिले आणि ली युएहॉंग याने 588 गुणांसह दुसरे स्थान मिळवले. 25 मीटर रॅपिड पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत सहापैकी तीन नेमबाज हे चीनचे होते, पण एकालाही पदक पटकावता आले नाही. कोरियाच्या ली गुनह्यूक याने 34 गुणांसह सुवर्ण, तर जपानच्या योशिओका डाई याने 33 गुणांसह रजत, तर अनिश भानवाला याने 28 गुणांसह ब्रॉंझपदकाला गवसणी घातली.
सांघिक गटातही यश
भारताच्या पुरुष संघानेही ट्रॅप सांघिक प्रकारात रजतपदक जिंकले. जोरावर संधू, किनन चेनाय, पृथ्वीराज थोंडायमन या नेमबाजांनी 341 गुणांसह रजतपदकावर नाव कोरले. कतारने सुवर्ण तर इराणने ब्रॉंझपदक मिळऴले. भारतीय नेमबाजांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 30 पदके मिळवली आहेत. त्यात 8 सुवर्ण, 14 रजत व 8 ब्रॉंझपदकांचा समावेश आहे.