सातारा – जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर हॉटेल व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. मात्र या हॉटेल व्यावसायिकांकडून रस्त्यांसाठी दुभाजकांची तोडफोड सुरु आहे, त्यामुळे रात्रीच्यावेळी ही ठिकाणी धोकादायक ठरत आहेत, त्यामुळे संबंधित व्यावसायिकाने परवानगी घेऊन दुभाजक फोडले आहेत का विनापरवानगीने फोडले आहेत, याची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
गेल्या काही वर्षामध्ये महामार्गावर मोठ्या प्रमाणात हॉटेल उभारली गेली आहेत. यामुळे रोजगार उपलब्ध होत असला तरी संबंधित हॉटेल व्यावसायिक हे रस्त्यांसाठी दुभाजक फोडत आहेत. त्यामुळे अनेकदा अपघाताचे प्रसंग उद्भवत आहेत. विशेष म्हणजे व्यावसायिकांकडून केली गेलेली दुभाजकाची तोडफोड ही परवानगीने आहे का परवानगीशिवाय याची माहिती प्रशासनाने घेऊन कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.