एक काळ असा होता की हॉलीवूडचे सिनेमे भारतात कधी रिलीज होतात, याची प्रेक्षक वाट बघत असायचे. वर्षातून एकदाच हॉलीवूडपट रिलीज व्हायचा आणि तो सिनेमा रसिकांचे लक्ष आपल्याकडे खेचून घ्यायचा. मात्र आता हा ट्रेंड राहिलेला नाही. वर्षाच्या सुरुवातीपासूनच हॉलीवूडचे सिनेमे एकापाठोपाठ एक करत रिलीज होतात आणि बॉक्स ऑफिसवर त्यांचे कमाईचा विक्रमही प्रस्थापित होतात.
गेल्या सात वर्षात अनेक हॉलिवूडपटांनी भारतात उत्पन्नाचे अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे बॉलीवूड आणि अन्य भाषांमधील सिनेमांपुढे एक आव्हानच उभे राहिले आहे. “अवेंजर्स एंड गेम’ हा या श्रेणीतला पहिला सिनेमा “अवेंजर्स एंड गेम’ ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 53.60 कोटी रुपयांची कमाई केली. या सिनेमाने जगभरातही उत्पन्नाचे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
गेल्याच आठवड्यात रिलीज झालेल्या “फास्ट अँड फ्यूरियस हॉब्ज ऍन्ड शॉ’ने आतापर्यंत 13.15 कोटी रुपयांचा धंदा केला. त्याच्याबरोबर रिलीज झालेल्या “खानदानी शफाखाना’ला यामुळे खूप मोठा फटका बसला होता. “अवेंजर्स एंड गेम’च्या अगोदर रिलीज झालेल्या “कॅप्टन मार्व्हल’ या सिनेमानेही 13 कोटी रुपयांचा धंदा केला होता. त्यामुळेच “अवेंजर्स एंड गेम’ बाबत खूप उत्सुकता निर्माण झाली होती.
“द लायन किंग’ या ऍनिमेटेड हॉलीवूडपटाने बाल प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले आहे. आतापर्यंत भारतात या सिनेमाने 11 कोटी रुपयांचा धंदा केला आहे. त्यात हा हिंदीमध्ये तयार झाला आणि शाहरुख आणि त्याच्या मुलाने डबिंग केल्यामुळे त्याची क्रेझ आणखीनच वाढली आहे.
“अवेंजर्स एंड गेम’मध्ये आयर्नमॅन मरतो. त्यामुळे जगभरातल्या निराश झालेल्या प्रेक्षकांसाठी स्पायडरमॅन चांगला पर्याय ठरला. “स्पायडरमॅन फार फ्रॉम होम’ मध्ये स्वतः स्पायडर मॅनही आयर्न मॅनच्या आठवणीत असलेले बघितले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 10 कोटी रुपयांचे ओपनिंग दिले होते.