सध्या गाजत असलेल्या “बेहद’ या मालिकेतील माया घराघरात लोकप्रिय झाली आहे. “बेहद’चा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे. पण यावेळी मायाच्या भूमिकेतील जेनिफर या शोमध्ये असणार नाही. डायलॉगबाजी करणारी जेनिफर तिच्या हटके अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली होती. आता तिच्याजागेवर “नागिन 3′ मधील सुरभी ज्योती “बेहद 2′ मध्ये दिसणार आहे. सुरभी ज्योतीने यापूर्वी “कुबूल है’मधून छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवली होती.
तिची लोकप्रियता बघून जेनिफरच्या जागेवर तिची निवड केली गेली आहे. जेनिफर आणि निर्मात्यांमध्ये मानधनावरून काही बेबनाव झाल्यामुळे “बेहद’ दुसऱ्या सीजनमध्ये जेनिफरला निवडले गेले नाही. “बेहद’च्या पहिल्या सीझनमधला कुशल टंडन हा देखील दुसऱ्या सीझनमध्ये असणार नाही. “नामांतरण’ या सिरीयल मधील विराफ पटेल हा “बेहञ्ण 2′ मध्ये असेल. सध्या जेनिफर “कोड एम’ या वेबसिरीजची तयारी करते आहे.